देश

विराट कोहली अन् रो’हिट’ शर्माचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा; केलं हे आवाहन

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रविवारी रात्री 9 वाजता कोरोनारूपी अंधाराला दूर सारण्यासाठी लाईट बंद करून दिवे, पणत्या, मोबाईल टॉर्च लावण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाला क्रिकेटपटू रनमशीन विराट कोहली अणि रोहित शर्माने पाठिंबा दिला आहे.

स्टेडियममधील शक्ती ही चाहत्यांवर अवलंबून असते. भारताचे स्पिरीट हे देशवासियांवर अवलंबून आहे. भारतीयांमध्ये कशी एकजूट आहे हे आज रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावून दाखवून द्या. आपला जीव वाचवणाऱ्यांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत, हे सर्वांना दाखवून द्या, अशा आशयाचं ट्विट करत विराटने दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे.

दुसरीकडे,  हा आयुष्याचा कसोटी सामना आपल्या सर्वांना जिंकायचा आहे. त्यासाठी आपण किती कणखर आहोत, आपल्यामध्ये किती एकजूट आहे आणि आपण सर्व मिळून या गोष्टीचा सामना कसा करत आहोत, हे आज ९ वाजता दिवे लावून दाखवून द्या, असं रोहित आवाहन रोहित शर्माने केलं आहे.

दरम्यान, भाजपचे विविध नेते, क्रिकेटपटू, उद्योगपती आज रात्री 9 वाजता देशवासियांना आपली एकी दाखवण्याचं आवाहन करत आहेत. रविवारी 5 एप्रिलला आपल्याला करोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून प्रकाशाची शक्ती दाखवून द्यायची आहे. यासाठी 5 एप्रिलला 130 कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा मोबईल टॉर्च लावण्याचं आवाहन मोदींनी देशवासियांना केलं आहे.

 

 

 

महत्वाच्या बातम्या –

-पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर

-‘कोरोना’काळातही काका-पुतण्यांमध्ये जुंपली; होम क्वारंटाइन करण्याच्या मागणीवर जयदत्त क्षीरसागर म्हणाले…

-मोदींनी केलेल्या आवाहनानुसार आज सर्वांनी वीज घालवली तर अडचण येईल का?; फडणवीस म्हणाले…

-उद्धव ठाकरे सरकारचे निर्णय अपुरे, मंत्र्यांमध्ये समन्वय नाही- देवेंद्र फडणवीस

-“दहावीच्या भूगोलाच्या पेपरची परीक्षा आता रद्दच करा”