Loading...
महाराष्ट्र मुंबई

“प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अन् आरोपीला 1 महिन्यात फाशी द्या”

मुंबई | हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार नवनीत राणा यांनी हिंगणघाट प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जावं आणि आरोपीला 1 महिन्यात फाशी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

जर आरोपीला एका महिन्याच्या आत फाशी दिली तरच पीडित तरूणीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोरात कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या.

Loading...

दुसरीकडे हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. घटनेचं वर्णन करणं अशक्य आहे. साहजिकच राज्यातील लोकांच्या मनात मोठा रोष आहे. त्या नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, सर्वपक्षीय महिला नेत्यांची आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी एकमुखाने पुढे येत आहे. तर राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी हैदराबाद प्रकरणामध्ये जसा आरोपीचा एन्काउंटर केला होता तसा हिंगणघाटच्या नराधमाचा एन्काउंटर झाला पाहिजे, तेव्हाच पीडितेच्या आत्म्याला शांती मिळेल; अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-बारामतीत होणार रणजी सामना; पवारांनी करून दाखवलंच!

-या राक्षसाचा सुद्धा एन्काउंटर करा…. त्याचवेळी पीडितेला न्याय भेटेल- सक्षणा सलगर

-नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही- उद्धव ठाकरे

-सरकार पीडितेच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं.. लवकरात लवकर न्याय देणार- बाळासाहेब थोरात

-‘या’ सदस्याच्या निधनानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर शोककळा

Loading...