“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे”

मुंबई | आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे. हे मी अनुभवलं आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. ते ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

काँग्रेस पक्षाचंही महत्त्व टिकलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगलं स्थान दिलं गेलं पाहिजे. दोघांचा समन्वय घडवून हे सरकार चालवलं जातं. मी त्याचा अनुभव घेतला आहे, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

मी मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीला कंट्रोल केलं असं म्हणणार नाही. मात्र मी काँग्रेसचं संख्याबळ टिकवण्याचं, पक्षाला बळकटी आणण्याचं काम केलं, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस पक्षाचे आमदार जास्तीत जास्त निवडून कसे येतील यावर लक्ष केंद्रीत केलं. मी मुख्यमंत्री असताना छगन भुजबळ, नारायण राणे, अजित पवार हे सगळे सोबतच होते. काहीवेळा कटु निर्णय घेतले असतील पण कुणालाही कह्यात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. तसंच आमच्यामध्ये योग्य समन्वय होता, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

-‘दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही?’; पुण्यातील रहिवाशाचं आयुक्तांना पत्र

-‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप

-दारूची होम डिलिव्हरी मिळणार; ‘या’ सरकारनं घेतला निर्णय

-मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना

-ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा