Loading...
महाराष्ट्र मुंबई

पवारांवर पीएचडी करणं ‘ये आपके बस का काम नही है’- रूपाली चाकणकर

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मागील पन्नास वर्ष राजकारणात असूनही त्यांना दहाच्या वर खासदार निवडून आणता आले नाही. त्यामुळे मला त्यांच्यावर पीएचडी करायची असल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. यावर राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील हे शिवाजी विद्यापीठातून शरद पवारांवर पीएचडी करणार असून त्यांचा उत्तम मानस आहे. मात्र त्याआधी चंद्रकांत पाटील यांनी पदव्युत्तर व्हावं. त्यात पास झाले तरच त्यांनी पीएचडी पात्रतेचा विचार करावा. तसेच पवारांवर पीएचडी करणं तुमच्याकडून होणार नाही, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Loading...

शरद पवार एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांचं म्हणणं कसं काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असं तिरकसपणे पाटील म्हणाले होते.

दरम्यान, रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या खणखणीत उत्तरावर चंद्रकांत पाटील काय म्हणतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-पुलवामा हल्ल्याने कुणाचा फायदा झाला??- राहुल गांधी

-‘व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थिनींना शाळेनं दिली शपथ; ‘मी प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही’!

-गेहलोत सरकारने ग्रामीण विकास योजनेचं नाव बदललं; गोळवळकर हटवून केलं महात्मा गांधी!

Loading...

-मागणी तुम्ही केली तर चालते; अन् आम्ही केली तर मग त्यात बिघडलं कुठं?- राज ठाकरे

-पोरगी गेली पळून; अन् बापाने गावात पोस्टर लावून वाहिली श्रद्धांजली!

Loading...