Top news पुणे महाराष्ट्र

वाढदिवसानिमित्त रूपाली चाकणकरांचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन

पुणे |  राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकरांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या हितचिंतकांना विशेष आवाहन केलं आहे. सध्या देशावर तसंच महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट असल्याने वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो मुख्यमंत्री सहाय्यता निधी द्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

आज 31 मे रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त मला आपण जिथे असताल तिथुनच शुभेच्छा व सदिच्छा द्याव्यात. आजपर्यंत या सामाजिक व राजकीय वाटचालीत आपण सर्वजण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात म्हणूनच हा माझा प्रवास इथपर्यंत येऊन पोहचला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण प्रशासनाला सहकार्य करूया, वाढदिवसानिमित्त आपण हार तुरे, केक हा सर्व खर्च टाळून तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावा, अशी विनंती करत हिच माझ्यासाठी सर्वात मोठी भेटवस्तू असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

लाॅकडाऊन संपल्यानंतर आपण जरूर सदिच्छा भेट घेऊ यात, वाढदिवस हे निमित्तमाञ आहे. आपण कायमच माझ्यासोबत आहात हे मी पावलोपावली अनुभूती घेतलेली आहे. हे ॠणानुबंध जपण्याचा कायमच प्रयत्न राहिल, असंही त्या म्हणाल्या.

सोशल मीडियाद्वारे त्यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे बँक डिटेल्स पोस्ट करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने हात बळकट करण्यासाठी मदतीचं आवाहन केलं आहे.

सोबत- मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे बँक डिटेल्स Chief Minister’s Relief Fund-COVID 19 Savings Bank Account number 39239591720 State Bank of India, Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023 Branch Code 00300 IFSC CODE- SBIN0000300

 

 

महत्वाच्या बातम्या-

-मलेरिया, डेंग्युला आळा घालण्यासाठी ‘हे’ काम हाती घ्या- आरोग्यमंत्री राजेश टोपे

-अभिनेता सोनू सूद राज्यपालांच्या भेटीला, वाचा भेठीपाठीमागचं कारण…

-कर्नाटकमध्ये भूकंप होणार?; नाराज भाजप आमदारांची बैठक

-देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रात, पत्रात म्हणतात…

-अक्षय बोऱ्हाडे गुन्हेगारी टोळ्यांशी परिचीत आहे- तृप्ती देसाई