Loading...
पुणे महाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांच्या बोलण्यात काही आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं नाही- रूपाली पाटील

पुणे | पुत्रप्रातीसाठी ऑड-इव्हन फॉर्म्युला दिल्यापासून प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर अडचणीत आले आहेत. NCPNDT या कायद्यांतर्गत त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे तर अंनिसच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आता महाराजांचे पाठीराखे आणि टीकाकार एकमेकांवर तुटून पडले आहेत. अशातच मनसेच्या नेत्या रूपाली पाटील यांनी इंदुरीकर महाराजांच्या बोलण्यात काही आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं नाही, असं ‘महाराष्ट्र केसरी’शी बोलताना म्हटलं आहे. माझं हे वैयक्तिक मत आहे, असं सांगायला देखील पाटील विसरल्या नाहीत.

महाराजांनी मुलगा-मुलगी जन्मासंदर्भात दिलेला दाखला हा धर्मशास्त्रात तर आहेच पण वैद्यकीय शास्त्राच्या अभ्यासक्रमात देखील आहे. मग महाराजांचं वक्तव्य एवढचं जर आक्षेपार्ह असेल तर सरकारने वैद्यकीय शास्त्राचा अभ्यासक्रम का बदलला नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Loading...

इंदुरीकर महाराजांनी जरी पुत्रप्राप्तीचा ऑड-इव्हन फॉर्म्युला सांगितला असला तरी त्यांनी असं कुठं सांगितलंय की तुम्ही मुलगाच जन्माला घाला किंवा मुलगीच जन्माला घाला… महाराज आपल्या कीर्तनात जसं स्त्रियांना बोलतात तसं पुरूषांनाही बोलतात, हे टीकाकार महिलांनी लक्षात ठेवायला हवं, असं त्या म्हणाल्या आहेत.

इंदुरीकर महाराजांची भाषा ही रांगडी आणि ग्रामीण आहे. त्यांना ऐकण्यासाठी हजारो लोक तिथं जातात मग ती लोकं काय मूर्ख आहेत का?? असा अजब सवाल त्यांनी महाराजांच्या टीकाकारांना विचारला आहे. महाराष्ट्रासमोरचे ज्वलंत प्रश्न सोडून इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर एवढी चर्चा करणं कितपत योग्य आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दुसरीकडे इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. जर गुन्हाच दाखल करायचा आहे तर मग गृहमंत्र्यांची भेट घेण्याचं काय कारण?? थेट पोलिस स्थानकात जावं… कोर्टात जावं…. बाईपणाचा गैरवापर चालणार नाही, अशा शब्दात त्यांनी तृप्ती देसाई यांना सुनावलं आहे.

स्त्री सक्षमीकरण, सुरक्षित झालीच पाहिजे आणि ती आम्ही करणारच… पण कोणाचा इगो नको त्या प्रसिद्धीसाठी बाईपणाचा गैरवापर चालणार नाही. समाजात स्त्री ही महत्वाची आणि पुरुषसुद्धा महत्वाचा आहे. समतोल राहावा. दोघांमधील तेवढी विकृती संपवावी. एवढंच, असं ट्वीट करत त्यांनी देसाई यांना लक्ष्य केलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

Loading...

-महाराज फक्त आवाज द्या…. ताकदीनिशी रस्त्यावर उतरतो- महेश लांडगे

तृप्ती देसाईंवर टीका करणाऱ्या इंदुरीकर भक्तांचा किशोरी शहाणेंनी घेतला खरपूस समाचार!

-ऐ भावा, इंदुरीकरांची कसली भारी हवा….. चाहत्यांनी बैलगाडीतून काढली मिरवणूक!

-पुण्यातली ‘सविताभाभी’ सापडली… दुसरी तिसरी कुणी नाही, ती आहे सई ताम्हणकर!!

-माझ्यापेक्षा सोमय्या अन् भांडारींची चिंता केली असती तर बरं झालं असतं; सावंतांचा पलटवार

Loading...