“चंद्रकांतदादा, मध्यावधी निवडणूक लागली तर तुम्ही कुठून लढणार पुणे की कोल्हापूर??”

पुणे |  सरकार चाललं नाही तर मध्यावधी निवडणूक होईल आणि ती निवडणूक डिसेंबरमध्ये होईल, असं मोठं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात बोलताना केलं होतं . त्यांच्या वक्तव्याने राजकीय गोटात खळबळ माजली होती. चंद्रकांत पाटील यांच्या याच वक्तव्याचा मनसे नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून अजूनही सत्ता गेली हे त्यांच्या पचनी पडत नाही असं दिसतंय. अजूनही भाजपला वाटतं की महाविकासआघाडीचं सरकार पडेल, असं म्हणत चंद्रकांतदादा निवडणुका लागल्या तर तुम्ही कुठून उभं राहणार पुणे की कोल्हापूर?, असा सवाल रूपाली पाटील ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटील यांना विचारला आहे.

तसंच आम्ही लढायला तयार आहोत असं सांगत तुम्ही कुठून लढणार हे फक्त सांगा, असं आव्हानही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे.

चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मेधा कुलकर्णी यांना खाली बसवून पक्षाने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली अन् त्यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांचा 40 हजार मतांनी पराभव करत विधानसभेत पाय ठेवला.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-आरोपीने जसा गुन्हा केलाय तशीच शिक्षा त्याला व्हायला हवी- रूपाली चाकणकर

-उद्धवजी, आपल्यातील भांडणं विसरून महिला सुरक्षेविषयी कठोर निर्णय घ्या- अमृता फडणवीस

-हिंगणघाटच्या राक्षसाला ‘हैदराबाद’सारखा न्याय द्या- प्रणिती शिंदे

-महात्मा गांधी काँग्रेससाठी ‘ट्रेलर’ असतील पण आमच्यासाठी ‘जीवन’- नरेंद्र मोदी

-“महाराष्ट्राच्या लोकांनी ज्यांना घरी बसवलं ते दिल्लीत जाऊन काय करणार?”