Top news विदेश

Russia Ukraine War: नको तेच झालं! रशियाकडून युक्रेनवर ‘फॉस्फरस बॉम्ब’चा वापर, आता…

ukrain e1648016691194
Photo Credit - Twitter/@Ukraine

नवी दिल्ली | रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine War) केलेल्या हल्ल्याला 28 दिवस पूर्ण झाले आहेत. दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये चर्चासत्र सुरूच आहे.

रशिया युक्रेनमधील इतर शहरांवर बॉम्बफेक करत आहे. अशा प्रकारे हे युद्ध दीर्घकाळ चाललं तर परिस्थिती काहीही असू शकते. अशातच आता मोठी माहिती समोर आली आहे.

रशिया युक्रेनच्या मारियुपोल शहरावर ताबा मिळवण्याचा पुर्ण प्रयत्न करत आहे. यासाठी आता रशियाकडून क्रूरतेच्या परिसीमा ओलांडल्याचं चित्र समोर येतंय.

मारियुपोल शहरावर रशियन सैन्याने फॉस्फरस बॉम्बच्या सहाय्यानं हल्ला केल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता युक्रेनी लोकांच्या जगण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे.

फॉस्फरस हा रंगहीन रसायनाचा एक प्रकार आहे. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानं फॉस्फरस पेट घेतो. वाईट फाॅस्फरसचा वापर केल्याने दिवसा देखील अंधाराची परिस्थिती निर्माण होते. तर पिवळ्या फाॅस्फरमुळे घातक असे रसायण बाहेर येते.

फॉस्फरसचा वापर युद्धादरम्यान स्फोटकं आणि धुराच्या आवरण तयार करण्यासाठी केला जातो. फॉस्फरस बॉम्बच्या संपर्कात आल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचा तत्काळ मृत्यू संभावतो.

दरम्यान, जैविक बाॅम्बचा वापर कोणत्याही युद्धात घातक मानलं जातं. त्यामुळे अमेरिकेने देखील जैविक साधनाचा वापर न करावा, असा इशारा रशियाला दिला होता. मात्र, रशियाने आता युक्रेनवर ताबा मिळवण्याची सर्व लाईन क्राॅस केल्याचं पहायला मिळतंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मेहुणे, मेहुणे, मेहुण्यांचेsss पाहुणे”, व्हिडीओ शेअर करत मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

Mahua Moitra: “अटलजींची भीती आज खरी ठरली”, महुआ मोइत्रा लोकसभेत कडाडल्या

Deltacron: काळजी घ्या! महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संशयित रूग्ण सापडले

 “भारतातल्या स्युडो सेक्यूलर जमातीने…”, The Kashmir Files वर बोलताना फडणवीसांची बोचरी टीका

Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”