नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धानं (Russia Ukraine War) अवघ्या जगाची चिंता सध्या वाढवलेली आहे. बऱ्याच प्रमाणात रशियावर निर्बंध लावूनही रशिया युद्ध थांबवण्याचा मानसिकतेत नाही.
रशियन सैन्याला जगातील सर्वात घातक सैन्यापैकी एक मानलं जातं. असं असलं तरी रशियाला युक्रेनवर ताबा मिळवत आलेला नाही.
रशियातील प्रमुख शहरांवर रशियाचं सैन्य जोरदार हल्ला करत आहे. तिन्ही सेना दलाच्या मदतीनं रशिया युक्रेनवर हल्ला करत आहे.
कीव, खारकीव्ह या शहरांव्यतिरिक्त महत्त्वाचं असलेलं मारियुपोल हे बंदर मिळवण्यासाठी रशियन सैन्य मोठी मेहनत घेत आहे. मारियुपोल शहरावर रशियाला ताबा मिळवू देणार नाही, असं युक्रेननं स्पष्ट केलं आहे.
मारियुपोल हे दक्षिण आणि पुर्व युक्रेनला जोडण्याचं काम करतं. युक्रेनच्या विकासात मारियुपोल बंदराचा फार मोठा वाट आहे. परिणामी रशियाला या बंदरावर ताबा मिळवायचा आहे.
मारियुपोल शहरामध्ये युरोपमधील सर्वात मोठा लोखंड आणि स्टिलचा प्लॅंट आहे. या शहरावर हल्ला केल्यानंतर युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला तडा गेला आहे.
मारियुपोल शहर मिळवणं हे आता रशियानं आपल्या प्रतिष्ठेचं बनवलं आहे. मारियुपोलवर गेल्या महिन्यातील सर्वात भयानक हल्ला करण्यात आला आहे.
दरम्यान, मारियुपोलवर रशियानं आतापर्यंत मोठे हल्ले केले आहेत. परिणामी 80 टक्के मारियुपोल शहर उद्ध्वस्त झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“कोण कोणासोबत झोपतो हे…”, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली
Health Tips For Summer: कडक उन्हाळ्यात ‘हे’ 7 पदार्थ नक्की खा… शरीराला आराम मिळेल
स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या प्रदीपचं आनंद महिंद्रांनी केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले…
Knee pain: कमी वयातच गुडघे दुखतात का?, ही लक्षणं दिसताच वेळीच सावध व्हा
“भाजपला झुंडचा इतका तिरस्कार आणि द कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का?”