“फडणवीस, महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी गुजरातची वकिली करत आहेत हे क्लेशदायक”

मुंबई | 1 मे 2015 रोजी मोदी सरकारने मुंबई आणि बंगळूरूचा प्रस्ताव फेटाळून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र अहमदाबादच्या गिफ्ट सिटीमध्ये स्थापन करण्याचे ठरवले, तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस होते व त्यांनी मुंबईवरील अन्यायास विरोध केला नाही. आताही ते महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी गुजरातचेच कसे बरोबर आहे याची वकिली करीत आहेत हे क्लेशदायक आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मुंबईत आर्थिक सेवा केंद्र होणार की नाही हा प्रश्न आता नाहीच, पण असे केंद्र निर्माण करण्यात मुंबई कशी कुचकामी ठरली आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे योगदान काय, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या काही उपटसुंभांकडून उपस्थित केले जात आहेत. ते चीड आणणारे आहेत, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

उद्या हे लोक असेही विचारतील की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवरायांचे योगदान काय? 105 हुतात्मे मुंबईसाठी झाले हे चूक असून ते प्लेगने मरण पावले अशी मुक्ताफळेही ते उधळतील. अशी विधाने करणाऱयांना हुतात्मा स्मारकाच्या बाजूला खांब उभारून त्यास बांधून ठेवायला हवे. इतके निर्लज्ज लोक महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्राशीच बेईमानी करतात हे कसे सहन करायचे?, असा संतप्त सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मुंबईहून गुजरातला हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यावरुन भाजप नेत्यांवर सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर ते या राज्यात राहण्याच्या लायकीचे नाहीत, असंच म्हणावं लागेल- संजय राऊत

-त्यांनी तयार केलेलं ‘सोशल’ औषध आता त्यांनाच ‘कडू’ लागतायत; राष्ट्रवादीचा व्यंगचित्रातून भाजपवर निशाना

-लॉकडाउनमध्ये थोडा दिलासा; ‘या’ ठिकाणी बससेवा होणार सुरू

-डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाची तहसीलदाराला मारहाण, हे आहे खरं कारण…

-पुणे शहर आणि जिल्ह्यात दारुची दुकाने सुरु होणार का?; आला महत्त्वाचा निर्णय