सचिन वांझेंचा पाय आणखी खोलात, एनआयएला वांझेंच्या घरात 62 जिवंत काडतु.से सापडली!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मनसुख हिरेन प्रकरण आणि मुकेश आंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फो.टकाच्या गाडीमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. एकमेकांशी संबंधीत असलेल्या या दोन्ही प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. याप्रकरणी रोज काही न काही तरी नवीन माहिती समोर येत आहे.

एनआयए या प्रकरणाचा शोध घेत आहे. या दोन्ही प्रकरणी सचिन वांझे सं.शयाच्या जाळ्यात अडकले आहेत.  याप्रकरणाचा तपास करत असताना एनआयएच्या हाती अनेक धक्कादायक गोष्टी लागत आहेत. अशातच आता एनआयएच्या हाती याप्रकरणी आणखी धक्कादायक पु.रावे लागले आहेत.

सचिन वांझे यांच्या घराची तपासणी करत असताना एनआयएला वांझेंच्या घरात 62 जिवंत काडतु.से आढळली आहेत. मात्र, या काडतु.सांबाबत वांझे काहीच खुलासा करत नसल्याने एनआयएने विशेष कोर्टाला सांगितलं आहे.

सचिन वांझे यांची 30 दिवसांची पोलिस को.ठडी संपत असल्यानं त्यांना आज विशेष कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी पो.लिसांनी वांझेेंवर अनेक गंभीर आ.रोप केले आहेत. त्याचप्रमाणे वांझे पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचं देखील म्हटलं आहे.

वांझेंना पो.लीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतु.से देण्यात आली होती.  त्यांना एक रि.व्हॉल्व.र देखील देण्यात आली होती. सध्या वाझेंकडे 30 पैकी पाच बु.लेट्स शिल्लक आहेत. मात्र, 25 काडतु,से गायब आहेत. ही 25 काडतु.से कोठे आहेत? हे देखील वांझे सांगत नसल्याचं एनआयएने कोर्टात म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फो.टकांनी भरलेली गाडी मिळाली होती. सध्या एनआयएकडून या जिलेटीन गाडीचा देखील त.पास केला जात आहे. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या नावावर होती. यानंतर काही दिवसांनी हिरेन यांचा संशयास्पद मृ.त्यू झाला.

मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृ.तदेह सापडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर राज्यात राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये या प्रकरणावरून आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी चांगलीच रंगलेली दिसत आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृ.त्यूनंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

वाहह! पेट्रोल आणि डिझेलचे भाव अखेर उतरले

कॅटवॉक करणारा कावळा तुम्ही पाहिलात का? हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल!

संतापजनक! वडिलांना अलिंगन घालण्यासाठी चिमुकली धावली अन् पोलिसांनी मागून गोळी झाडली

धक्कादायक! 62 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करत केली बेदम मारहाण

पहिल्यांदाच डेटवर गेली तरुणी पण भलतीच फजिती झाली; व्हिडीओ व्हायरल