Top news

“अमोल मिटकरी म्हणजे राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा”

Amol Mitkari

सांगली | सदाभाऊ खोत यांनी सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मिटकरींच्या आक्षेपार्ह भाषणाविषयी पत्रकारांनी सदाभाऊ खोत यांना प्रश्न विचारला. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी मिटकरी यांची तुलना तमाशाच्या फडावरच्या नाच्यासोबत केली.

अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा आहे, असं आक्षेपार्ह वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. आता यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

सदाभाऊ खोत यांनी  मिटकरी यांची तुलना तमाशाच्या फडावरच्या नाच्यासोबत केली. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही अनेक गंभीर आरोप केले आहेत.

अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा आहे. राष्ट्रवादीच्या नाच्याला फार गांभीर्याने घ्यावं, असं मला वाटत नाही, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना शरद पवारांवर देखील टीकास्त्र सोडलं आहे. सदाभाऊ खोत यांनी पवारावंर गंभीर आरोप केले आहेत.

या राज्यामध्ये जातीयवादाला खतपाणी हे खऱ्या अर्थाने पवारसाहेबांनी घातलेलं आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षात प्रत्येक जातीचा नेता तयार केला आहे. ज्याने त्याने आपापली जात सांभाळायची, त्याच्या बदल्यात कितीही भ्रष्टाचार करायचा, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“तुम्ही काय केलं हिंदुत्वासाठी?, बाबरी पडली तेव्हा तर तुम्ही बिळात लपला होतात” 

“लाथ मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं अशी त्यांची वृत्ती…” 

मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!

भाजपची सर्वात मोठी घोषणा, 26 मे ला देशभर… 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेत्याला अटक