तैमुर होणार दादा! सैफच्या घरी ‘कोणीतरी येणार येणार गं’; करीनाकडून पुन्हा एकदा गुड न्युज

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमधील एक म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी पुन्हा एकदी आनंदाची बातमी दिली आहे.  करीना आणि सैफच्या घरात आता एक नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे. यासंदर्भात सैफ अली खानने माहिती दिली आहे.

आम्हाला सांगायला प्रचंड आनंद होतोय की, आमच्या कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद, असं सैफ अली खान म्हणाला.

घरात दोन मुलं तर असायलाच हवेत, जेणेकरुन एकमेकांना कंपनी मिळेल, अशी प्रतिक्रिया करीनाच्या वडीलांनी म्हणजे रणधीर कपूर यांनी दिली. करीना आणि सैफ यांनी 2012 साली लगीनगाठ बांधली होती. त्यानंतर करीना 2016 साली पहिल्यांदा आई बनली. तिचा पहिला मुलगा तैमूर आता जवळपास साडेतीन वर्षांचा झाला आहे.

दरम्यान, तैमूर सोशल मीडियावर प्रचंड लाईमलाईटवर असतो. कारण त्याचा एखादा फोटो किंवा व्हिडीओ सोशल माध्यमांवर आला तर तो कमी वेळात मोठ्या व्हायरल होतो.

महत्वाच्या बातम्या-

गोड बातमी! मुंबईतील कोरोना संक्रमण नियंत्रणात येत आहे; कोविड सेंटरमधील तब्बल इतक्या हजार खाटा रिकाम्या

“उद्धव ठाकरे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तपासात गडबड करू शकतात”

पार्थच्या बोलण्याला आपण कवडीची किंमत देत नाही; शरद पवारांनी पार्थ पवारांना फटकारलं

वाढीव वीज बिलासंदर्भात राज्य सरकार आज घेणार महत्वाची भूमिका

सतत गोड खाताय?; वेळीच व्हा सावधान नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ वाईट परिणाम!