आम्हाला सलून उघडायला परवानगी द्या, नाहीतर….; सलून व्यावसायिक आक्रमक

अहमदनगर | कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन सुरू होतं. मात्र आता लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथीलता येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्र सरकारने सलून उघडायला 30 जूनपर्यंत परवानगी दिलेली नाही. त्यामुळे हातावर पोट असलेल्या केशकर्तन करणाऱ्या कारागिरांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सलून व्यावसायिकांनी आता संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.

एकतर सलून दुकाने उघडण्यास परवानगी द्या किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक सलून व्यवसायिकाला प्रति महिना 10 हजार रुपये आर्थिक सहाय्य करा, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सरकारकडं केली आहे. ह्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महामंडळाने दिला आहे.

30 जूनपर्यंत सलून व्यवसाय महाराष्ट्रात पूर्णपणे बंद राहील, असं राज्य सरकारने जाहीर केल्यामुळे केशकर्तन करणाऱ्या कारागिरांचा पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सलून व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट उभं ठाकले आहे.

अशा परिस्थितीत नाभिक समाजाला सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने महामंडळानं आक्रमक पवित्रा घेत सलून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी नाहीतर आर्थिक सहाय्य करावं, अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पक्षाला मिळालेल्या यशात आमचा थोडा तरी वाटा असेल ना?; सत्यजित तांबेंचं कार्यकर्त्यांची खदखद मांडणार पत्र

-हार्दिक पांड्या म्हणतो, कुणी तरी येणार येणार गं…!

-‘सरकारने काम केलं नसतं तर…’; गुजरात उच्च न्यायालयाकडून आता सरकारचं कौतुक

-गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे श्रीमंतांचे सरकार आहे – प्रकाश आंबेडकर

-“मुंबई-महाराष्ट्रात बेड्सची पुरेशी संख्या, कोरोनाचा सामना करण्यास ठाकरे सरकार खंबीर”