इंदुरीकरांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या वादात आता शिवप्रतिष्ठानची उडी!

सांगली | पुत्रप्राप्तीसाठी ऑड इव्हनचा फॉर्म्युला सांगणारे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज चांगलेच अडचणात आले आहेत. 8 दिवसांनंतर अखेर त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला परंतू मला तसं म्हणायचं नव्हतं असं म्हणत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असा माफीनामा त्यांनी जारी केला आहे. मात्र त्यांच्यावरची टीका काही केल्या कमी होत नाहीये. तसंच त्यांना समर्थनही वाढताना दिसत आहे. अशातच आता या वादात शिवप्रतिष्ठाने उडी घेतली आहे.

हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथ, वेध, उपनिषेध या सगळ्यांचा अभ्यास करून महाराजांनी धर्मातील बाजू लोकांसमोर मांडली. त्यांच्या कीर्तनातील मोजक्या भागाचा विपर्यास केला गेला आहे. पण काहीही असलं तरी महाराजांच्या पाठीशी भक्कमपणे शिवप्रतिष्ठान उभं असल्याचं शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि संभाजी भिडे यांचे विश्वासू सहकारी नितीन चौगुले यांनी म्हटलं आहे.

तृप्ती देसाई यांच्यासह अंनिस इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. मात्र सरकारने जर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर शिवप्रतिष्ठान संपूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल, असा इशारा चौगुले यांनी दिला आहे.

दरम्यान, इंदुरीकर वारंवार आपल्या कीर्तनातून महिलांचा अपमान करत असतात. त्यांनी सांगितलेल्या फॉर्म्युल्यामुळे त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कलमानुसार गुन्हा दाखल झालाच पाहिजे. ते नेहमी आपल्या कीर्तनातून महिलांना दुय्यम स्थान देतात यासंदर्भातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदुरीकरांना पाठिंबा देण्यासाठी तांदळवाडीचे महाराज झोपले बाभळीच्या काट्यावर!

-नकळत बोलून गेले असतील… त्याचं इतकं काय भांडवल करता?- सिंधुताई सपकाळ

-“मासिक पाळीत स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी कुत्री होणार”

-दाणादाण उडालेल्या दिल्ली काँग्रेसची धुरा आता ‘या’ महिल्या नेत्यावर?

-“फक्त महाराजांनी नाही तर त्यांच्या समर्थकांनी देखील माफी मागितली पाहिजे”