सॅमसंगचे ‘हे’ तीन 3 स्मार्टफोन 12 हजार रूपयांपर्यंत झालेत स्वस्त!

मुंबई |  सॅमसंगची गॅलेक्सी एस 20 फोन सिरीज लॉन्च केल्यानंतर कंपनीने आपल्या एस 10 मालिकेतल्या स्मार्टफोनची किंमत खूपच कमी केली आहे. कंपनीच्या गॅलेक्सी एस 10 सिरीजमध्ये 3 फोन उपलब्ध आहेत. त्यामध्ये गॅलेक्सी एस 10, गॅलेक्सी एस 10+ आणि गॅलेक्सी एस 10 E हे फोन आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एस 10 आणि एस 10+ च्या किंमतीत 12 हजार रुपये आणि गैलेक्सी एस 10 च्या किंमतीत 8 हजार रुपयांनी कपात करण्यात आली आहे. ग्राहक सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन नवीन किंमतीत फोन विकत घेऊ शकतात.

फोन स्वस्त झाल्यानंतर ग्राहक सॅमसंग गॅलेक्सी 10 च्या 128 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 54,900 रुपये आणि 512 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये झाली आहे. सुरूवातीला फोन 66,900 रुपयांच्या किंमतीला लाँच झाला होता.

गॅलेक्सी S-10 128 जीबी रॅम 73,900 रुपयांऐवजी 61,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय गॅलेक्सी एस 10 E च्या किंमतीत 8,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

सॅमसंगची S-20 सिरीज-

सॅमसंगने प्रीमियम फोन गॅलेक्सी एस 20 मालिका सुरू केली आहे, ज्याच्या कॅमेरामध्ये आर्टिफिसीयल इंटिलिजन्स सारखी वैशिष्ट्ये आहेत. गॅलेक्सी एस 20, एस 20, गॅलेक्सी एस 20 प्लस आणि गॅलेक्सी एस 20 अल्ट्रा 5 जी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-चंद्रकांत पाटील, पवारसाहेबांना ओळखायला तुम्हाला 10 जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे

-फिल्म इंडस्ट्री नेहमी सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहिलेली आहे- नसिरूद्धीन शाह

-आयपीएल सुरू झाली रे…. असं असेल वेळापत्रक!

-व्होडाफोन भारतातला आपला गाशा गुंडाळणार?

-“दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना विरोध करणं हे तर भाजपच्या DNA मध्ये”