Top news महाराष्ट्र मुंबई

“आम्ही येतोय रे ठाण्याला कोण अडवतंय बघूया, हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे”

मुंबई | ठाणे, पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पालघर जिल्हा, ठाणे ग्रामीण, ठाणे, नवी मुंबई, मुंबई तसेच रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याची नोटीस शुक्रवारी बजावण्यात आली आहे. यावर मनसेने आक्रमक भूमिका सरकारविरोधात घेतली आहे. आम्ही येतोय रे ठाण्याला कोण अडवतंय बघूया, असं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

जेव्हा सरकार आलं तेव्हा हे शिवशाहीचं सरकार असं म्हणालात, पण हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, जिथे अन्याय दिसेल, तिथे मनसैनिकांची लाथ पडणार, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारी स्वरूपाचा खटला नाही. कोव्हिडसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी आंदोलन केलं. आकासापोटी ही कारवाई करण्यात आलेली असल्याचं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.

दरम्यान, गुन्हे दाखल करुन आम्हाल गप्प बसवता येईल असं सरकार आणि पालकमंत्र्यांना वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

दडी मारलेला पाऊस करणार दैना; पुढील 4 दिवस ‘या’ भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

देशाच्या राजकारणावर पसरली शोककळा ‘या’ खासदाराचे निधन

‘ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो’; राम शिंदेच्या टीकेला ‘या’ खासदाराचं प्रत्युत्तर

सुशांतच्या आत्महत्येच्या रात्री सुशांतसोबत असणाऱ्या मित्राने सांगितली ‘त्या’ रात्रीची कहानी; म्हणाला…

…त्यामुळे सदाभाऊ पिसाळल्यासारखं करत आहेत; राजू शेट्टींचं जोरदार प्रत्युत्तर!