Top news

सांगलीच्या आजीबाईंचा पॅटर्नच वेगळा; वयाच्या 94 व्या वर्षी केली कोरोनावर मात!

grand mother

सांगली | कोरोनाच्या संकटामुळे सारं जग चिंतेत असताना सांगलीमधून मात्र एक चांगली बातमी समोर आली आहे. एका ९४ वर्षांच्या आजीने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यासंदर्भात माहिती शेअर केली आहे. त्यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर खात्यावरुन ट्विट केलं आहे.

सांगलीतील कामेरी येथे वास्तव्यास असणाऱ्या ९४ वर्षांच्या आजींना मिरज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, ही आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी आणि सकारात्मक बाब आहे. आजीची शुश्रूषा केलेल्या सर्वांचे आभार. आजी, तुम्हाला सुदृढ आयुष्य लाभो हीच प्रार्थना, असं जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलं, गर्भवती महिला आणि वृद्ध लोकांना असल्याचं सांगितलं जातं. मात्र सांगलीच्या आजीबाईंनी ९४ वर्षाच्या वयात कोरोनावर यशस्वी मात करुन नवा लढवय्या आदर्श इतरांपुढे घालून दिला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“देवेंद्र फडणवीस सज्जन माणूस, त्यांनी छाती फाडून दाखवायची का?”

-15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी घोषणा

-म्हण…म्हणून गोपिचंद पडळकरांना विधान परिषदेचं तिकीट दिलं- चंद्रकांत पाटील

-मध्यम, कुटीर, लघु उद्योगांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

-प्रॉमिस तोडलं म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…