उदयनराजेंच्या खासदारकीला संजय काकडेंचा आक्षेप; म्हणाले, उदयनराजेंचं योगदान काय??

पुणे |  राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांची पुढील राजकारणाची दिशा भाजपने ठरवल्याची चर्चा होती. उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू होत्या. मात्र भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उदयनराजेंच्या राज्यसभेवर जाण्यावर किंबहुना त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

भाजपकडून राज्यसभेवर जाण्यासाठी उदयनराजे इच्छुक असतानाच उदयनराजेंचं भाजपसाठी योगदान काय? त्यांना का उमेदवारी द्यावी? असे सवाल संजय काकडे यांनी उपस्थित केले आहेत.

उदयनराजेंना उमेदवारीसंदर्भात भाजप अजिबात घाई करणार नाही. उदयनराजेंचं पक्षासाठी काही मोठं योगदान नाहीये. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला, भाजपमध्ये आले आणि नंतर झालेल्या निवडणुकीत पडले? यापलीकडे त्यांचं भाजपसाठी योगदान ते काय? असं संजय काकडे म्हणाले आहेत.

उदयनराजे यांचे भाऊ शिवेंद्रराजे फक्त निवडून आले बाकी उदयनराजेंना एकही आमदार निवडून आणता आला नाही, अशी टीकाही काकडे यांनी उदयनराजेंवर केली आहे. त्यामुळे उदयनराजेंना उमेदवारी देण्यासंदर्भात पक्ष कोणताही निर्णय तूर्तास घेणार नाही असं मला वाटतं, असं काकडे म्हणाले.

दरम्यान, भाजपकडून राज्यसभेसाठी संजय काकडे पुन्हा एकदा इच्छुक आहेत. देवेंद्र फडणवीस मला डावलतील असं वाटतं नाही… पण डावलल्यानंतर पुढचं काय ते बघू, असा इशारा द्यायला देखील काकडे विसरले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या-

-….म्हणून आता 12 वी चे विद्यार्थी नापास होणार नाहीत!

-“1947 मध्येच सगळ्या मुस्लिमांना पाकिस्तानात हाकलून द्यायला पाहिजे होतं”

-वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारीस पठाण यांच्यावर एमआयएमची मोठी कारवाई

-भारतात 1 कोटी लोक माझं स्वागत करणार- डोनाल्ड ट्रम्प

-ओवैंसींच्या सभेत गोंधळ; तरूणीकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा!