पाच दिवसांचा आठवडा करणं म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

मुंबई | राज्य सरकारनं राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय मुर्खपणाचा असल्याचं निरूपम यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारचा पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय निव्वळ मुर्खपणाचा आहे. एका आठवड्यात दोन सुट्या देण्याला अर्थ काय?, असं म्हणत संजय निरूपम यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सरकारी कर्मचारी त्यांच्या आळशीपणामुळे प्रसिद्ध आहेत. सरकार त्यांच्या कामचुकारगिरीला बक्षिस देत आहे का?, असा सवाल संजय निरूपम यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच दिवसांच्या आठवड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र या निर्णयावरून सरकारमधील काही नेत्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-सरकारी कर्मचाऱ्यांना जेवायला 2 तास आणि चहाला 1 तास…; 5 दिवसांच्या आठवड्यावर राजू शेट्टी नाराज

-बाबांनो, सरकारला गोत्यात आणणारी वक्तव्य करू नका; उद्धव ठाकरेंचा सल्ला

-शेतकरी पुत्रांच्या लग्नासाठी राजू शेट्टी घेणार पुढाकार!

-…म्हणून देशातल्या कोणत्याही नेत्यांना केजरीवाल शपथविधीसाठी बोलावणार नाही!

-राजकीय पक्षांना न्यायालयाचा दणका; उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर…