“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर प्रदेश आणि गोव्यात परिवर्तन होईल असं भाकित केलं आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे.

ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले?, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केलाय.

उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे. या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं, असं चंद्रकांत पाटलांनी राऊतांना सुनावलं आहे. आता
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

चंद्रकांत पाटील यांना योग्य वेळी माहिती देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम उत्तम सुरू आहे. येत्या 13 तारखेला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा, अशी टीका संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे.

तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही, असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठीच होती. अनेकदा अनेक व्यक्ती त्या पदावर पोहोचू शकल्या नाहीत तरी त्यांची उंची कमी होत नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान, फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला. काल एका मंत्र्याने पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदार प्रविण झाटे यांनींही पक्ष सोडला. त्यांनी पक्षातील युद्ध जे सुरु आहे, त्याची लढाई करावी, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपचे लोक महाराष्ट्रातून गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत. महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा जात आहेत. शिवसेना गोव्यात या नोटांशी नक्की लढेल. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा, हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना फडणवीसांच्या नोटांना पुरून उरेल. मी फडणवीस यांना सांगेन की तुम्ही कितीही नोटा टाका. शिवसेना गोव्यात नक्की लढेल, असं राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणेकरांसाठी गुड न्यूज; शहरातील निर्बंधांबाबत अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती 

काळजी घ्या…, कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहेत ‘ही’ नवी लक्षणं 

नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! 

“…म्हणून ओमिक्रॉन व्हेरिएंटला वेगाने पसरू दिलं पाहिजे” 

“संजय राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील अन् मुख्यमंत्री…”