देश

संजय राऊतांच्या आयुर्वेदिक कोंबडी अन् शाकाहरी अंड्याने राज्यसभेतले खासदार बुचकाळ्यात!

Sanjay Raut In Rajyasabha

नवी दिल्ली |  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आयुर्वेदिक कोंबडी आणि शाकाहारी अंड्य़ाच्या किस्स्याने राज्यसभेतले खासदार अवाक झाले. राज्यसभेत सोमवारी आयुष मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. या चर्चासत्रात राऊत यांनी सहभाग नोंदवला.

या चर्चेत बोलताना संजय  राऊत म्हणाले, मी नंदुरबारमध्ये एका गावात गेलो होतो. त्यावेळी मला जेवणासाठी कोंबडी बनवण्यात आली होती. पण मी आज कोंबडी खाणार नाही, असं म्हटल्यावर आदिवासी बांधवांनी ही साधी कोंबडी नाही तर आदिवासी कोंबडी आहे. यामुळे तुमचे सर्व रोगदूर होतील, असं म्हटलं.

संजय राऊत यांनी आणखी एका विषयावर मंथन केलं. तो विषय होता शाकाहारी अंड्याचा…! चौधरी चरण सिंह विद्यापीठातून आलेल्या काही लोकांनी आम्ही आयुर्वेदिक अंड्यावर संशोधन करत आहोत, असं सांगितलं. ही अंडी बनवण्यासाठी कोंबडीला फक्त आयुर्वेदिक खाद्य दिलं जातं. यापासून तयार झालेली अंडी पूर्णपणे शाकाहारी असतात आणि मांसाहर न करणाऱ्यांना प्रथिनांची गरज असेल तर तेही खाऊ शकतात, अशी माहिती संशोधकांनी दिल्याचं संजय राऊत म्हणाले.

आयुष मंत्रालयाने अंडी शाकाहारी की मांसाहरी हे लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, संजय राऊत यांच्या भाषणानंतर राज्यसभेतले खासदार जरासे बुचकाळ्यात पडले.

पाहा संजय राऊत यांनी राज्यसभेत केलंलं संपूर्ण भाषण-