संजय राऊत सुशांत सिंगला ‘या’ मोठ्या राजकारण्याचा रोल देणार होते, पण…

मुंबई |   हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंगने वयाच्या 34 व्या वर्षी गळफास घेऊन आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला. त्याच्या आत्महत्येचं काय कारण असावं? याबद्दल मुंबई पोलिस कसून चौकशी करत आहेत. मात्र अशातच सुशांत सिंग बद्दल एक नवी माहिती समोर आली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत सुशांत सिंगला एक महत्त्वाचा रोल देणार होते. माजी केंद्रिय मंत्री दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर एका विशेष चित्रपटाची निर्मिती होणार होती. या रोलसाठी चेहरे शोधण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी सुशांतच्या नावाचा देखील विचार सुरू होता. परंतू सुशांत मानसिक तणावाखाली असल्याचं त्यावेळी संजय राऊत यांना कळालं.

सुशांत हा माझ्या नजरेत होता. तो एक उत्तम अभिनेता होता. त्याच्या कामावर सगळ्यांचं प्रेम होतं. त्यामुळे जॉर्ड फर्नांडिस यांच्या बायोपिकसाठी सुशांतच्या नावाचा विचार करण्यात आला होता, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

दुसरीकडे सुशांतकडून मागील काही दिवसांपूर्वी सहा चित्रपट काढून घेण्यात आले होते, असे दावे अनेकजण करत आहेत. याचमुळे तो मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा सुरू होती. तसंच त्याच्याविरोधात बॉलिवूडमधला एक गट सक्रिय होता, अशीही चर्चा सुशांतच्या जाण्यानंतर ऐकायला मिळाली.

महत्वाच्या बातम्या-

-भारताकडे डोळे वर करुन पाहाल तर तुमचे डोळे काढून घेण्याची ताकद आमच्यामध्ये- नरेंद्र मोदी

-देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे

-पुणे विभागात सलून सुरु करण्यास परवानगी; ‘या’ नियमांचं पालन करणं बंधनकारक

-सुशांतच्या आत्महत्येनंतर झालेल्या ट्रोलिंगनंतर आता करण जोहरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-‘ही राजकारणाची वेळ नाही’; शरद पवारांचा काँग्रेसला टोला