“पवारांना ईडीची नोटीस आली त्यादिवशी मी त्यांना म्हटलं, साहेब हे सगळं बदलायला पाहिजे…”

नाशिक |  तत्कालिन भाजप सरकारने शरद पवार साहेबांना ज्यादिवशी ईडीची नोटीस दिली त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच तमाशा झाला. त्यावेळेसच माझ्या डोक्यात ठिणगी पेटली. मी पवारसाहेबांना तात्काळ भेटायला गेलो आणि भेटल्यावर त्यांना सांगितलं, साहेब हे सगळं बदलायला पाहिजे असं म्हणत राष्ट्रवादी-सेना-काँग्रेसचा एकत्रित येण्याचा विचार तेव्हापासून माझ्या डोक्यात सुरू झाला, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

उर्जा युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मुलाखतीत राजू परूळेकर यांनी संजय राऊत यांना बोलतं केलं. यावेळी राऊतांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.

आम्ही सत्तेचा अमरपट्टा लावून आलो आहोत आमची सत्ता जाणारच नाही, असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा देश देश राहत नाही. सत्ता आली की मातू नका गेली तरी रडत बसू नका, अशा शेलक्या शब्दात त्यांनी फडणवीसांसह भाजपला टोला लगावला.

सुरुवातीला शिवसेना बार्गेनिंग पावर वाढवत आहेत असं म्हटलं गेलं. मात्र, मला आणि शरद पवारांना सत्तास्थापनेबाबत विश्वास होता. शरद पवार यांना जास्त विश्वास होता. भाजपचा विश्वास संपला होता, असंही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-“अदनाने 4 वर्षात अशी काय कामगिरी केली म्हणून त्याला ‘पद्मश्री’ दिला”

-पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळणार शिवभोजन थाळी; अजित पवारांनी केला शुभारंभ

-चिदंबरम यांना अटक केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव!

-केंद्रावर प्रचंड टीका झाल्यानंतर अखेर शरद पवारांच्या घराची सुरक्षा कायम!

-उद्धव ठाकरे अनुभवशून्य, त्यांच्या कार्यकाळात राज्य अधोगतीकडे जाईल- नारायण राणे