Top news महाराष्ट्र मुंबई

‘गरज सरो, वैद्य मरो’; संजय राऊत मोदी सरकारवर बरसले

narendra modi sanjay raut 5

मुंबई | पाच राज्यातील निवडणुकांचा संदर्भ देत ‘गरज सरो, वैद्य मरो’ असं म्हणून इंधन दरवाढीचे तेल महागाईच्या वणव्यात ओतल्याचं म्हणत खरमरीत टीका शिवसेनेनं केंद्र सरकारवर केली आहे. यावेळी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात इंधनाचे दर सांगून महागाईवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात इंधन दरवाढीवरुन केंद्रावर निशाणा साधत म्हटलंय की, पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ केंद्र सरकार रोखून धरेल आणि निकाल लागले की, या दरवाढीचा बुलडोझर सामान्य जनतेवर बिनदिक्कतपणे फिरविला जाईल, अशी भीती व्यक्त होत होतीच. ती अखेर खरी ठरली आहे, असं ते म्हणालेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या घरगुती गॅसचे सिलिंडर थेट 50 रुपयांनी महाग करण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे पेट्रोल पुन्हा शंभरीच्या पुढे, तर घरगुती गॅस सिलिंडर एक हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी तर तब्बल दोन हजार रुपये मोजावे लागणार आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.

इंधन दरवाढीचे पाप केंद्र सरकार युक्रेन आणि रशियाच्या माथी मारु शकते, असंही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलंय.

रशिया युद्ध आणि त्यामुळे जागतिक बाजारात उडालेल्या कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका आमच्या नियंत्रणात नाही, असं सांगून इंधन दरवाढीचे पाप केंद्र सरकार रशिया आणि युक्रेनच्या माधी मारू शकते, ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्रावर इंधन दरवाढीवरुन टीकास्त्र सोडण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“पंडित नेहरुंच्या त्या चुकीचे परिणाम आजही देश भोगतोय” 

बंडा तात्यांकडून महात्मा गांधींचा म्हातारा म्हणून उल्लेख, म्हणाले… 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या ट्विटने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ 

“प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन” 

“होय, आम्ही गांधी-नेहरू घराण्याचे गुलाम आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहू”