20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की पट्टीचा अर्थतज्ज्ञही चाट पडावा- संजय राऊत

मुंबई | पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींचे वाटप अर्थमंत्र्यांनी असे ‘पटापट’ केले की, पट्टीचा अर्थतज्ञही चाट पडावा, तरीही पंतप्रधानांनी निर्मला सीतारामन यांचे तोंडभरून केलं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अर्थमंत्री निर्मला सीताारमन यांना लगावला आहे. मोदींनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न राऊत यांनी आजच्या अग्रलेखात केला आहे.

20 लाख कोटी ही साधी रक्कम नाही. या 20 लाख कोटींचा हिशोब अर्थमंत्र्यांनी मांडताच पहिल्या पाच मिनिटांत शेअर बाजार घसरला, तो अद्यापि सावरू शकलेला नाही. अशा प्रकारचे मोठे आर्थिक पॅकेज जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात घसरून आपटलेला हिंदुस्थान हा पहिला देश असावा. याचा अर्थ असा की, 20 लाख कोटी प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात अवतरतील काय? याबाबत कॉर्पोरेट जगतात शंका आहे. उद्योगांत विश्वास निर्माण करण्याची क्षमता देशाच्या अर्थमंत्र्यांमध्ये आहे काय?, असा सवाल राऊत यांनी अग्रलेखातून केला आहे.

पंतुप्रधानांच्या मते 20 लाख कोटींत देश पुन्हा उभा राहील. मुख्य म्हणजे आत्मनिर्भर होईल, ही आत्मनिर्भरता सर्वच क्षेत्रांत यायला हवी. चिनी मालाची आवक थांबलेली नाही. ती थांबवल्याची घोषणा केल्याशिवाय मेणबत्त्यांपासून काडीपेटीपर्यंत आपल्या लघू, सूक्ष्म उद्योगांना उठाव मिळणार नाही, असा सल्ला देखील राऊत यांनी केंद्राला दिला आहे.

दुसरीकडे पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’ म्हटल्याने आधीच्या सर्व संकल्पना आणि योजना मागे पडल्या आहेत. ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’वर आतापर्यंत कोटय़वधी रुपये नुसते जाहीरातबाजीवर खर्च केले तसे आत्मनिर्भरतेच्या बाबतीत घडू नये, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मेक इन आणि स्टार्ट अप इंडियाच्या जाहीरातबाजीवर कोट्यवधी खर्च केले तसं आत्मनिर्भरतेच्या बाबतीत घडू नये”

-“नटून थटून टीव्हीवर येण्यापूर्वी मजुरांचे हाल पाहा”

-…तर माझा भरोसा धरू नका; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

-कोरोनानं बदलला वकिलांचा ड्रेस कोड; पाहा आता काय झालाय बदल…

-मॉडेलला प्रवास करायला राज्यपालांनी मदत केल्याचं वृत्त; मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल