मी एक संवेदनशील व्यक्ती आहे, काही चूक झाली, तर मी माफी मागायला तयार- संजय राऊत

मुंबई | मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आमची काही चूक झाली, तर मी माफी मागायला तयार आहे, अशा स्पष्ट शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुशांत प्रकरणात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

सुशांत सिंहच्या वडिलांनी केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे तो नाराज होता. सुशांत सिंह राजपूत आणि त्याचे वडिल के. के. सिंह यांच्यातील नातं फारसं चांगलं नव्हतं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं होतं. यावर सुशांतचा भाऊ नीरज कुमारे त्यांना 48 तासात माफी मागण्याची कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सुशांत प्रकरणाला न्याय मिळायला हवा. सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते मला माहिती नाही. परंतू मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की आमची काही चूक झाली तर मी माफी मागेल, असंही राऊत यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस सक्षम आहेत. तेच या प्रकरणाचा तपास करतील. मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन त्यांच्यावर दबाव आणून कोणाला काही लपवण्याची दुर्बुद्धी सुचली असेल, तर ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो, असा टोलाही राऊतांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! आईचं वात्सल्य हरवलं; शुल्लक रकमेसाठी आपल्या पोटचा गोळा विकला

“मोदी है तो मुमकीन है”; राहुल गांधी पुन्हा कडाडले

दादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख आहेत त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार- जयंत पाटील

“भारतीय संघाच्या ‘या’ यष्टीरक्षकाच्या बायकोनं विराटला तंदरुस्त राहण्यासाठी केलं होतं प्रोत्साहित”

‘पार्थच्या बोलण्याला आपण कवडीची किंमत देत नाही’; आजोबांच्या तिखट प्रतिकियेवर पार्थ पवार म्हणाले…