Uncategorized

हिंदूस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही, ते फक्त गांधी, नेहरु आणि पटेलांमुळेच- संजय राऊत

मुंबई | हिंदूस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही याचे श्रेय निश्चितच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांकडे जाते, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते रोखठोकमध्ये बोलत होते.

गांधी, नेहरु आणि पटेलांवर आज जे चिखलफेक करण्याचे पाप करत आहेत, ते पाप करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा गांधींजींनीच मिळवून दिलं आहे. एवढं तरी त्यांनी लक्षात ठेवावं, असं म्हणत राऊतांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.

Loading...

गांधींजींच्या विचारांशी जे सहमत नाहीत ते सुद्धा मान्य करतील स्वांतत्र्य चळवळीच्या काळात गांधींसारखा कोणताही नेता नव्हता. आपण महात्मा गांधींची आणखी किती वेळा हत्या करणार आहोत? असा सवालही त्यांनी केला आहे.

गांधींजींचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मान्य करुन नथुराम गोडसेने आधी गांधींच्या पायांना स्पर्श केला आणि नंतर त्यांच्यावर गोळी झाडली. गोडसेप्रेमींनी गांधींवर अश्लाघ्य टीका करताना गोडसेची सभ्यताही स्वीकारायला हवी, असंही ते म्हणाले आहेत.

-महात्मा गांधींच्या तोडीचा नेता स्वातंत्र्य चळवळीत झाला नाही म्हणूनच…- संजय राऊत

-“चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल तर माझी हरकत नाही”

-‘हिंदूहृदयसम्राटांचा छावा’ मनसे कार्यकर्त्याकडून राज ठाकरेंना नवी उपाधी

-मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबवलं; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

-“देशाच्या वैभवकाळाला आणि पतनाला हिंदूच जबाबदार आहे”