महाराष्ट्र मुंबई

“शरद पवार सिर्फ नामही काफी है. महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावं लागतं”

मुंबई | शरद पवार सिर्फ नामही काफी है. महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावं लागतं आणि हे आपण दाखवून दिलं आहे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

विधानपरिषदेचे आमदार आणि लोकभारती प्रमुख कपिल पाटील यांनी मुंबईत मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी शरद पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

Loading...

आधीच्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. आयचा घो हा शिवसेनेने संमत केलेला शब्द आहे, असं देखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, पाच वर्षात भाजपने पाठ्यपुस्तकातले धडे आणि इतिहास बदलला त्यामुळे आपण सरकार बदललं. लोकशाहीमध्ये यापेक्षा कोणता मोठा धडा असू शकतो?, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-चितळे उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा काकासाहेब चितळे काळाच्या पडद्याआड

-कसाबला फासावर पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर बायोपिक

-“दांडी मार्च ते दंडा मार! काँग्रेसने चांगलीच प्रगती केली”

-शरद पवारांच्या हत्येचा कट, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल

-नवऱ्याला आवडली नाही नवरीची साडी म्हणून नवऱ्याने मोडली संसाराची घडी