महात्मा गांधींच्या तोडीचा नेता स्वातंत्र्य चळवळीत झाला नाही म्हणूनच…- संजय राऊत

मुंबई | महात्मा गांधींच्या तोडीचा नेता स्वातंत्र्य चळवळीत झाला नाही. त्याचं हे मोठे पण मान्य करूनच नथुराम गोडसे यांनी आधी गांधींच्या पायाला स्पर्श करून मग त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोडसे प्रेमींनी गांधींवर टीका करताना गोडसेची सभ्यताही स्वीकारायला हवी, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

गांधीमुळं हिंदुस्तानचा पाकिस्तान झाला असं ज्यांना वाटतं त्यांनी पक्षाच्या बैठकीत मोदी शहांकडे पाकिस्तान पुन्हा जिंकून घेण्याची मागणी करायला हवी. हे साहस कुणात आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. सामानामध्ये लिहिलेल्या एका लेखाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी सध्या देशात सुरू असलेल्या गांधींजींच्या बदनामीवर भाष्य केलं.

गांधीजींची बदनामी करणं त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणं त्यांच्या हेतूवर शंका घेणं हे पापच आहे. पण हेगडे आणि प्रज्ञा यांना हे पाप करण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार गांधीमुळेच मिळालं हे लक्षात घेतलं पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान नव्हतं ते सर्व आता स्वातंत्रलढ्यास भाडोत्री आणि गांधींना इंग्रजांचे एजंट म्हणू लागले आहेत. गांधी हा अभिमान वाटण्याऐवजी त्यांना कलंक वाटत आहे हे धक्कादायक आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-“चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल तर माझी हरकत नाही”

-‘हिंदूहृदयसम्राटांचा छावा’ मनसे कार्यकर्त्याकडून राज ठाकरेंना नवी उपाधी

-मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबवलं; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

-“देशाच्या वैभवकाळाला आणि पतनाला हिंदूच जबाबदार आहे”

-…अन् लालकृष्ण अडवाणींना झाले अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ