Top news खेळ

आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये वाद, संजू सॅमसन भडकला

sanju samson e1648225083505
Photo Credit - Twitter/@IamSanjuSamson

मुंबई | जगप्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणून आयपीएलनं आपली ओळख निर्माण केली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला 26 तारखेपासून सुरूवात होत आहे.

यावर्षी दहा संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. अशात प्रत्येक संघानं आपापली तयारी केली आहे. यामध्ये संघाच्या सोशल मीडिया टीमनं तर धमाल केल्याचं सध्या दिसत आहे.

सोशल मीडिया टीम सध्या आपल्या खेळाडूंवर मीम्स देखील शेअर करत आहेत. पण खरा गोंधळ तर तेव्हा झाला जेव्हा राजस्थान राॅयल्सच्या टीमनं कर्णधार संजू सॅमसनवर मीम तयार केला.

राजस्थानच्या सोशल मीडिया टीमनं संजूचा एक फोटो एडिट करून महिलेसारखा बनवला होता. क्या खूब लगते हो, असं कॅप्शन दिलं होत. मात्र तो फोटो संजूला अजिबात आवडला नाही.

संजूनं राजस्थान राॅयल्सच्या ट्विटर अकाऊंटला टॅग करत नाराजी दर्शवली आहे. मित्रांनो असं करण ठीक आहे पण संघानं प्रोफोशनल राहीलं पाहीजे, असं संजू म्हणाला आहे.

संजू सॅमसननं एवढ्यावर न थांबता राजस्थान राॅयल्सचं ट्विटर खातंच अनफाॅलो केलं. परिणामी संघ व्यवस्थापकांनी सोशल मीडिया टीमला काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

आम्ही आमची सोशल मीडिया टीम बदलत आहोत. आजच्या प्रकरणामुळं आम्ही नवीन पद्धतीचा अवलंब करू, असं राजस्थानच्या संघव्यवस्थापकांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, स्पर्धेच्या सुरूवातीला काही तास शिल्लक असतानाच हा वाद घडल्यानं सर्वत्र चर्चा होत आहे. संजू किंवा अन्य कोणताही खेळाडू नाराज नसल्याची माहिती राजस्थानच्या संघव्यवस्थापकांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात”

 The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका 

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

  देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…