सारा अली खानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, वरून धवनसह रणवीर सिंगनं देखील केलं ट्रोल!

मुंबई | बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असते. ती सतत सोशल मीडियावर काही न काही शेअर करत असते. ती सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोजबरोबर काही वैयक्तिक व्हिडिओ देखील शेअर करत असते.

नुकतंच साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. साराचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एवढंच नाही तर वरून धवनसह रणवीर सिंग यांनी देखील साराच्या या व्हिडिओवर कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे.

साराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पहिल्यांदाच जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. यानंतर अचानक ती ‘कुली नं. 1’ या चित्रपटातील ‘जेठ की दोपहरी में’ यावर डान्स करताना दिसली. हा व्हिडिओ शेअर करत साराने ‘सुनहरी दोपहर’ असा कॅप्शन दिला आहे.

साराच्या याच व्हिडिओवर रणवीर सिंग आणि वरून धवनने कमेंट केली आहे. साराच्या या व्हिडिओवर कमेंट करत रणवीर सिंग म्हटला की, नि:शब्द. एकदम नि: शब्द. तसेच वरून धवन साराच्या या व्हिडिओवर कमेंट करत म्हटला की, मला ती व्यक्ती आवडते जी बॅकग्राउंडमध्ये वर्कआउट करण्याचा प्रयत्न करते.

दरम्यान, अभिनेत्री सारा अली खान आणि वरुण धवन आजकाल आपल्या आगामी ‘कुली नंबर 1’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हे दोन्ही चित्रपट ख्रिसमसच्या निमित्ताने 25 डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.

सारा अली खान आणि वरुण धवनचा चित्रपट ‘कुली नंबर 1’ हा 1995 मध्ये रिलीज झालेल्या ‘कुली नंबर 1’ याच चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूरची जोडी दिसली होती.

चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता नव्याने पुन्हा येणाऱ्या वरुण-साराचा हा चित्रपट १ मे रोजी रिलीज होणार होता. मात्र, कोरोना विषाणूच्या काळात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. आता हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चंद्रकांत पाटील भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार? भाजप नेते म्हणाले…

हिवाळी अधिवेशनातील वातावरण तापलं! मुनगंटीवारांचं ‘ते’ चॅलेंज स्विकारत अजित पवार म्हणाले…

पीएम उज्ज्वल योजनेंतर्गत 3200 रुपये भरून एक लाखाचं कर्ज मिळणार? वाचा सविस्तर

कॉंग्रेसला आणखी मोठा झटका! ‘हा’ दिग्गज नेता राजकारणातून संन्यास घेणार?

कंगनाने घेतली भाजपच्या ‘या’ मंत्र्याची भेट, काय आहे यामागे कारण?

सावधान! औषधांच्या पाकिटावरील या ‘लाल रेषे’चा अर्थ तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर