सुजय डहाकेला कानफडण्याची सौरभ गोखलेची भाषा; काढली थेट लायकी!

मुंबई |  मराठी मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत नेहमी ब्राह्मण मुली दिसतात. बहुजन समाजातील मुली का नाहीत? असा सवाल करत मराठी इंडस्ट्रीचं जातीयवादी रूप उलगडण्याचा किंवा त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पुरस्कार विजेता युवा दिग्दर्शक सुजय डहाके याने एका मुलाखतीत केला होता. मात्र त्याचं वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. मराठी कलाकारांनी त्याचं वक्तव्य कसं खोटं आहे ते दाखवून देण्यास सुरूवात केली असून सुजयच्या वक्तव्यावर ते तुटून पडले आहेत.

अभिनेता सौरभ गोखले याने सुजयच्या विरोधात फेसबुक पोस्ट लिहून त्याला थेट कानफडण्याची भाषा वापरली आहे. आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर कलाकारांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुमची लायकी नाही, असं त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके…. आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर कलाकारांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुमची लायकी नाही. पुन्हा या प्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी, अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहून त्याने सुजय विरोधातला राग व्यक्त केला आहे.

दरम्यान, सुजयच्या विरोधात आज शशांक केतकर, तेजश्री प्रधान यांनीही उघड विरोधी भूमिका घेत त्याचा जोरदार समाचार घेणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत.

सौरभ गोखले याने लिहिलेली फेसबुक पोस्ट-

महत्त्वाच्या बातम्या-

-अण्णा हजारे यांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; पत्रात म्हणतात…

-दाभोळकर हत्याप्रकरणातील ‘हा’ मोठा पुरावा सापडला सीबीआयच्या हाती!

-…म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या 7 खासदारांना केलं निलंबित!

-इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघ पोहोचला अंतिम फेरीत!

-तक्रार मागे घे नाही तर…; विद्या चव्हाणांनी सुनेला धमकावलं