Loading...
पुणे महाराष्ट्र

आमचे पूर्वज हिंदूच होते मग आम्ही नागरिकत्वाचा दाखला का द्यावा?- पद्मश्री सय्यदभाई

पुणे | माझेही पूर्वज हे हिंदूच होते. ते अरबस्थान किंवा इतर प्रांतातील नव्हते. मग नागरिकत्व कायद्याद्वारे एकाच समाजाची चौकशी किंवा कागदपत्रे का मागितली जात आहेत?, असा सवाल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांनी सरकारला केला आहे.

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सय्यदभाई यांचा ‘स्त्री आधार केंद्र’ आणि ‘परिवर्तन’ संस्थेच्यावतीने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुण्यात विशेष सत्कार करण्यात आला.

Loading...

देशात सध्या अनेक ठिकाणी महिला नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांच्याकडे सरकारने गांभिर्याने पाहण्याची गरज असून सरकारकडून एखाद्या तरी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असं सय्यदभाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी आपली कामं जनतेसमोर मांडली. तर विरोधकांना त्यांची काम दाखवता आली नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालातून विरोधकांना उत्तर मिळाले आहे, अशा शब्दांत सय्यदभाई यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या- 

-पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचं टीकास्त्र

-सरकारी कर्मचाऱ्यांना जेवायला 2 तास आणि चहाला 1 तास…; 5 दिवसांच्या आठवड्यावर राजू शेट्टी नाराज

-बाबांनो, सरकारला गोत्यात आणणारी वक्तव्य करू नका; उद्धव ठाकरेंचा सल्ला

-शेतकरी पुत्रांच्या लग्नासाठी राजू शेट्टी घेणार पुढाकार!

-…म्हणून देशातल्या कोणत्याही नेत्यांना केजरीवाल शपथविधीसाठी बोलावणार नाही!

Loading...