औरंगाबाद | मनसेला (MNS) आणखी एक धक्का बसलाय. औरंगाबाद मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे (Suhas Dashrathe) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
सुहास दशरथे हे औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे मोठे नाव होते. त्यांच्या नेतृत्वात मनसेने जिल्ह्यात मोठी लोकप्रियता मिळवली होती. पण, पक्षांतर्गत कारणांमुळे चार महिन्यांपूर्वी त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली.
सुहाज दशरथे जागी सुमित खांबेकर यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. तेव्हापासूनच दशरथे पक्षावर नाराज होते.
ते इतर पक्षांच्या संपर्कातही होते. आता अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेस करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेपूर्वी पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी एक पत्रक काढत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचं म्हटलं आहे.
औरंगाबाद शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 आणि कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत 9 मे 2022 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विविध सामाजिक, राजकीय पक्ष, संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. याआधी घबरदारी म्हणून पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिलेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भर मांडवात नवरा बायकोची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
‘….हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही’; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
मोठी बातमी! राज ठाकरेंना झटका, सभेपूर्वी पोलिसांनी उचललं मोठं पाऊल
“माझ्यावर टीका करणाऱ्या अनेकांना मी खिशात घेऊन फिरतो”
अखेर Elon Musk यांनी विकत घेतलं ट्विटर, मोजले ‘इतके’ पैसे