पुणे महाराष्ट्र

हिंगणघाट प्रकरण ताजं असतानाच पुण्यात तरूणीला अ‌ॅसिड टाकण्याची धमकी

पुणे  |  अ‌ॅसिड टाकण्याची धमकी देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या आईने कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी एका 25 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे.

मुलगी कोरेगाव परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. आरोपी तिचा दररोज पाठलाग करायचा. दररोज शाळेबाहेर थांबायचा. तसेच तुझ्या चेहऱ्यावर अ‌ॅसिड ठाकेन आणि तुझ्या घरच्यांनाही ठार मारेल, अशी धमकी आरोपी द्यायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपीने पीडित मुलीला जबरदस्तीने वाघोली परिसरात नेले होते. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, शिवाय याचा व्हिडीओही त्याने तयार केला होता. घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली होती.

पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला; माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय- यशोमती ठाकूर

-राज साहेब, तुम्ही हिंसा करण्याची भाषा करत असाल तर…- नवाब मलिक

-नराधमाला माझ्यासमोर जाळून मारा; पीडितेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

-…म्हणून मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

-हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची 7 दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी