मला काश्मीरच्या संघाचा कर्णधार व्हायचंय- शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली | कोरोना विषाणूमुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी आफ्रिदीने नुकताच पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला. या दरम्यान आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

पंतप्रधान मोदी यांच्या मनात काश्मीरबद्दल कोरोना व्हायरसपेक्षा ही अधिक विष आहे असं वक्तव्य त्याने केलं होतं. त्यानंतर आता काश्मीर संघाचा कर्णधार बनायचं आहे असं आणखी एक वाद ओढवून घेणारं वक्तव्य त्याने केलं आहे.

मी आता असलेल्या परिस्थितीचा योग्य उपयोग करेन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विनंती करेन की पुढच्या वर्षीच्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत एक संघ वाढवण्यात यावा. काश्मीर नावाच्या संघाला स्पर्धेत समाविष्ट करून घेण्यात यावे आणि माझ्याच्या शेवटच्या वर्षात मला काश्मीर संघाचे नेतृत्व करायला मिळावं, असं आफ्रिदीने म्हटलं आहे.

दरम्यान, मला इथे येऊन क्रिकेटचे सामने पाहायला नक्कीच आवडेल. स्पर्धेतील चांगल्या खेळाडूंना मी माझ्यासोबत कराचीला घेऊन जाईन आणि अधिकचं प्रशिक्षण देईन, असं आफ्रिदी म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; रेड झोनच्या बाहेर लॉकडाउन शिथिल

-तुम्ही कोणत्या झोनमध्ये? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद; जाणून घ्या

-“सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा”

-चीनपासून वेगळं असल्याचं सिद्ध करा, अन्यथा…; डोनाल्ड ट्रम्प यांचा WHOला इशारा

-शरद पवारांनी पंतप्रधानांऐवजी एखादं पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहावं- देवेंद्र फडणवीस