मोदी सरकार नकारात्मक आहे; शाहिद आफ्रिदीचा निशाणा

नवी दिल्ली | मोदी सरकार नकारात्मक आहे, अशी टीका पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याने केली आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून त्याने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तरने भारत पाक क्रिकेट सामने व्हावे, असं म्हटलं होतं. मात्र कपील देव यांनी शोएबच्या म्हणण्याला विरोध केला होता. भारत पाक क्रिकेट सामने सद्य परिस्थितीत होऊ शकत नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं.

शाहिदने शोएबची बाजू घेत मोदी सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तान भारताबरोबर खेळण्यास सकारात्मक आहे. मात्र भारत सध्या सकारात्मक भूमिका घेत नाही. आम्हाला अपेक्षा आहे की येत्या काळात भारत देखील येत्या काळात पाकिस्तानबरोबर सामने खेळेन, असं शाहिदने म्हटलं आहे.

मोदी सरकारच्या नकारात्मकतेमुळे भारत पाकिस्तान सीरिज होत नाही, असं तो म्हटला आहे. मात्र भारत आणि पाकिस्तानमधले संबंध चांगले झाले पाहिजेत. क्रिकेटमुळे दोन्ही देश एकमेकांजवळ येतात, असं मत त्याने व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-यंदा सरासरीच्या शंभर टक्के पाऊस पडणार; हवामान खात्याचा अंदाज

-धक्कादायक! मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह महिलेची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या

-भारत-पाक क्रिकेट मालिका होणे शक्य नाही – सुनिल गावसकर

-“जागे व्हा आणि कामाला लागा अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल”

-“राज्यावरच्या अर्थसंकटाचे परिणाम दीर्घकाळ जाणवतील”