Top news महाराष्ट्र मुंबई

कोरोनाचा सामना करण्यासाठी शरद पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य आणि केंद्र सरकारच्या सहायता कार्यास हातभार लावण्यासाठी राज्य विधिमंडळ सदस्यांच्या एका महिन्याचं वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य विधीमंडळाच्याच नव्हे तर संसद सदस्यांचंही एक महिन्याचं वेतन राष्ट्रवादी ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’ला देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कसोशीनं प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळत आहे. ही जागतिक महामारी रोखण्यासाठी संचारबंदीसारखी कडक पावलं देखील उचलण्यात आली आहे. लोकांचा रोजगार बुडाला असून शेती तसेच उद्योगधंद्यांवर मोठे संकट कोसळलं आहे, असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विधीमंडळ तसेच संसद सदस्यांनी सदर धनादेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जमा करावेत, असं आवाहन देखील शरद पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या 7 मोठ्या घोषणा

-आज महाराज असते तर त्यांनी माझा लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता- तृप्ती देसाई

-“मी मराठ्यांची लेक आणि सून; माझी बदनामी करणारे 80 टक्के तरुण मराठाच”

-लोकांनो कृपया गर्दी करू नका, आता सगळं व्यवस्थित होईल; मंत्री बाळासाहेब थोरातांना विश्वास

-कोरोनावर उपाय सुचवा, 42 लाख रूपये कमवा; केंद्र सरकारचं चॅलेंज