Top news पुणे महाराष्ट्र

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी उलटली; एक्स्प्रेस वेवर अपघात

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. शरद पवार हे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरुन पुण्याहून मुंबईला जात होते. त्यावेळी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

पोलिसांची गाडी स्लिप होऊन उलटली. पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी आहेत. तर शरद पवारांची गाडी सुखरुप मुंबईकडे रवाना झाली. सुदैवाने पोलिसांना मोठी दुखापत झाली नसल्याचं कळतंय.

शरद पवार हे पुण्यावरुन मुंबईकडे निघाले होते. अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला. शरद पवारांची गाडी पुढे होती. त्यामुळे त्या गाडीला काहीही झालं नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, अपघातग्रस्त वाहन हटवलं.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी आता ‘या’ अभिनेत्रीची चौकशी होणार

-शोएबला भारतात असलेली त्याची पत्नी सानियाला भेटायचं आहे पण…

-राज्यात जून महिन्यात आतापर्यंत जवळपास 29 लाख थाळ्यांचं वाटप, भुजबळांची माहिती

-वारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं

-कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी….., नवाब मलिक यांची महत्त्वाची माहिती