कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नो ‘हँडशेक’नंतर आता सभाही रद्द; पवारांचा खबरदारीचा उपाय

नाशिक | कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून सर्वांना खबरदारीचे उपाय सांगण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोरोनाचा धसका घेतल्याचं पहायला मिळतंय.

आज नाशिकमध्ये पवारांचा पूर्वनियोजित शेतकरी मेळावा होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसंच थोड्या दिवसांसाठी एकत्र येण्याचं टाळूया, असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.

परवादिवशी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी कोरोना सुरक्षिततेबाबत अप्रत्यक्ष संदेश दिला.  शरद पवारांनी पुरस्कार घेतल्यानंतर हात मिळवण्यासाठी आलेल्या पुरस्कारकर्त्याला हात न मिळविता दोन वेळा हात जोडून नमस्कार केला.

दरम्यान, अजित पवार यांनीदेखील बारामतीच्या कार्यक्रमात मिश्किलपणे कोरोनावर भाष्य करत खबरदारी घेण्याचा सल्ला दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-“साहेब.. आता वनवास संपलाय, लवकरच अयोध्येकडे निघावं लागेल”

-माझ्याकडे जन्माचा दाखला नाही मग मी काय जीव देऊ का?; मुख्यमंत्र्यांचा मोदी-शहांना सवाल

-मराठीत भाषण न केल्यामुळं मला रोखलं; सदावर्तेचा शिवसेनेवर गंभीर आरोप

-गृहखात्यावर नांदगावकरांची तर जलसंपदावर अनिल शिदोरेंची नजर; पाहा मनसेचं शॅडो कॅबीनेट

-अरे बाबांनो तुम्ही आमच्याकडून कामाची अपेक्षा ठेवता, पण मतदान करत नाही- राज ठाकरे