लॉकडाऊन काही भागात शिथील करता येईल का?, पवारांची मोदींना विचारणा

मुंबई | काही ठिकाणचं लॉकडाऊन शिथील करता येतं का ते बघावं, अशी विचारणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. नरेंद्र मोदी यांच्यासोबत पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘कोरोना’ या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली आहे.

ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे, अशी सूचनाही पवारांनी यावेळी केली आहे. ‘कोरोना’ साथीला आटोक्यात आणल्यानंतर आर्थिक संकटे ओढवल्यास काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्यादृष्टीने नॉन-प्लॅन एक्‍सपेंडिचर म्हणजे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.

केंद्र शासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून ते लांबणीवर टाकता येईल का, याचाही विचार व्हावा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे. ह्या देशात अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला असल्याने कोणीही उपाशी राहू नये याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

-“14 एप्रिलनंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवणार नाही”

-“केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको”

-“लोकहो, घरात व्यायाम करा, ज्यांना त्रास आहे त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवा; आपल्याला युद्ध जिंकायचंय”

-…म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केलं अटक