पुणे महाराष्ट्र

“आज मी पार्लमेंटमध्ये बसतो… सतत 52 वर्ष 14 वेळेला निवडून येणारा एकमेव सभासद तुमच्या महाराष्ट्रातला आहे”

पुणे |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. ते नास्तिक आहेत. त्यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असा फतवा राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढला होता. यावर शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आज शरद पवार आळंदीत जोग महाराज पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात ते चांगलेच भावूक झालेले पाहायला मिळाले.

शरद पवारांकडे वारकरी समाजाने इंद्रायणी स्वच्छता आणि सुशोभीकरणाची मागणी केली. वारकऱ्यांच्या या मागणीवर शरद पवार म्हणाले-

गेली 52 वर्ष या महाराष्ट्राच्या माणसांनी मला निवडून दिलं. आज मी पार्लमेंटमध्ये बसतो… सतत 52 वर्ष 14 वेळेला निवडून येणारा एकमेव सभासद तुमच्या महाराष्ट्रातला आहे. आता आणखी काय द्यायचं लोकांनी…. चार वेळेला मुख्यमंत्री केलं. केंद्रिय संरक्षणमंत्री केलं… केंद्रिय कृषीमंत्री केलं… लोकांनी आणखीन द्यावं तरी काय… ज्यांनी मला इतकं दिलं त्यांनी माझ्याकडे एवढंस मागितलंय तर ते मी थांबवायचं… अजिबात थांबवणार नाही. लवकरात लवकर हे प्रकरण आपण मार्गी लावूया. याठिकाणी नगराध्यक्ष आहेत, जि.प. अध्यक्ष आहेत. आमदार आहेत. माझी तिघांना सूचना आहे येत्या 8 ते 10 दिवसांत माझ्याकडे मुंबईला या… अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या सगळ्यांना एकत्र करतो आणि एवढं झालं पाहिजे, असं त्यांना सांगतो.

Loading...

वारकऱ्यांची इंद्रायणी स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या मागणीची दखल शरद पवार यांनी तातडीने घेत पालकमंत्र्यांची यामध्ये जबाबदारी जास्त आहे… बघतो त्यांना सांगून काय म्हणतायेत ते…. अशी मिश्किल टिप्पणी केली.

कुठलाही हेतू ठेऊन मी या कार्यक्रमाला आलेलो नाहीये. वाटेल तेव्हा मी आळंदी, पंढरपूर, देहूला जात असतो. प्रसिद्धीसाठी राजकारण हा मोठा गैरसमज आहे, असं पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मिसळ प्रेमींना दिलं नितेश राणेंनी हटक्या अंदाजात निमंत्रण

-शरद पवारांनी तरुणाला विमानातून दाखवला चाकण अन् मगरपट्टा; मराठवाड्याच्या तरूणाला झालं आभाळ ठेंगणं

-… म्हणून संभाजी भिडेंना अटक होण्याची शक्यता

-“अंगाऱ्या धुपाऱ्याने मंत्री झालेल्या पाटलांचं पद दोन चार महिन्यात जाणार”

-कर्जमाफीच्या हिशेबात बँकांचा घोळ; मंत्री बच्चू कडू यांचा धक्कादायक अहवाल