शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या आखाड्यात… राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई| राज्यसभेसाठी शरद पवार यांनी आज अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच काँग्रेसचे अन्य जेष्ठ नेतेही उपस्थित होते.

जरी शरद पवारांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला असला तरी महाविकास आघाडीमध्ये चौथ्या जागेसाठी असलेला तिढा अजूनही सुटलेला नाही. राष्ट्रवादीकडून आज शरद पवार आणि फौजिया खान अर्ज दाखल करतील, असं सांगण्यात येत होतं. पण चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीकडून आज शरद पवारांचाच अर्ज भरण्यात आला.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सात उमेदवार जाणार आहेत. यासाठी 13 मार्च रोजी निवडणूका होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपने मात्र त्यांच्या नावाची यादी अजून जाहीर केलेली नाही.

विधानसभेतल्या सध्याच्या संख्याबळानुसार राज्यसभेवर 7 पैकी महाविकासआघाडीचे 4 तर भाजपचे 3 उमेदवार निवडून जाऊ शकतात. या 7 पेक्षा एखाद्या उमेदवाराने अर्ज भरला तर मात्र राज्यसभेसाठी निवडणूक होऊ शकते. जर सातच अर्ज दाखल झाले, तर मात्र राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल.

महत्वाच्या बातम्या – 

“कोरोना आला तर हजारोंनी मास्क घेतले… अपघाताने रोज 600 मरतात तरी हेल्मेट का घेत नाही”

-काँग्रेसवर हल्लाबोल करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

-जरा थांबा… कमलनाथ अजूनही चमत्कार करु शकतात; शरद पवारांना विश्वास

-कोरोना पासून वाचण्यासाठी पंकजाताईंनी दिला हा सल्ला…

-मोदींच्या हातात भारताचं भविष्य सुरक्षित; भाजपात येताच महाराजांना साक्षात्कार