राज्यपालांच्या भेटीनंतर पवार ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा

मुंबई | सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यावर ते मातोश्रीला देखील गेल्याचं समोर आलं आहे. खुद्द शिवसेना नेते आणि खासदार संदय राऊत यांनीच तसं सांगितलं आहे.

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी ‘मातोश्री’वर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील, तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

राज्यात कोरोनाचं संकट अधिक गहिरं होतं आहे. अशातच पवारांनी राज्यपालांची भेट घेतल्यावर मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली, यावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणखी वाढवण्यासंबंधी सुतोवाच केलं आहे. तर पवार मात्र आता लॉकडाऊन उठवला पाहिजे, या मतापर्यंत आले आहेत. याचसंबंधी त्यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-बिपिन रावत दर महिन्याला पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडला देणार

-राज्यात आज 1196 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, पाहा नव्याने किती रूग्णांची झालीये नोंद

-मुंबई विमानतळावरून दररोज 25 विमाने करणार उड्डाण; ठाकरे सरकारचा निर्णय!

-मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा, सोबतच केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

-‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं