Loading...
देश

दिल्लीत भाजपला पराभव अन् आपच्या विजयानंतर शरद पवार यांचं ट्वीट

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. 70 जागांपैकी आप 58 जागांवर आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभेचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे.

अरविंद केजरीवाल यांचे खूप खूप अभिनंदन… तसंच दिल्लीच्या विजयासाठी आपच्या कार्यकर्त्यांची अभिनंदन, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे. दिल्लीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी केजरीवालांचं कौतुक देखील केलं आहे.

Loading...

दिल्ली निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाहीये. यावरच बोट ठेवत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसला मार्मिक सल्ला दिला आहे. काँग्रेसकडे खूप चांगले नेते आहेत. त्यांनी संघटनात्मक कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळी संघटनात्मक काम चांगलं असतं त्यावेळी निवडणुकीत त्याचा चांगला परिणाम दिसून येतो, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

दुसरीकडे दिल्लीत धन बल और छल हार गया और मौहब्बत जात गयी, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीत काँग्रेसला शरद पवार मिळाले नाहीत??; रोहित पवार म्हणाले….

-दिल्लीत सुफडासाफ झाल्यानंतर रोहित पवार यांचा काँग्रेसला सल्ला; म्हणाले…

Loading...

-इथं द्वेषाचं राजकारण होणार नाही… आज प्रेम जिंकलं; दिल्ली विजयानंतर आपची प्रतिक्रिया

-“भाजपच्या पदरी अपयश…. मात्र 2024 लोकसभेला दिल्ली मोदींंच्याच पाठीशी उभी राहिल”

-दिल्लीत केजरीवालांची हॅट्रीक होणार…. पण ‘आप’ला सगळ्यात मोठा धक्का बसणार?

Loading...