कोरोनावर इंजेक्शन निघालंय पण…; पाहा शरद पवार काय म्हणाले

सातारा | कोरोनावर इंजेक्शन निघालं आहे. पण ते आपल्याला परवडणारं नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी बातचित केली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

आता आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे. आत्मविश्वासानं उभं राहणं, स्वत:ची काळजी घेणं, हाच पर्याय आहे. कोरोनावर इंजेक्शन निघालं आहे. पण, आपल्याला ते परवडणारं नाही. आपल्या देशात मिळत नाही. 30 ते 35 हजार रुपये आपल्या माणसाला परवडणारं नाही, असं पवार म्हणाले.

इथून पुढे लोकांना कोरोना सोबत जगावं लागणार आहे. मला वाटतं काळजी घेतली तर कोरोनाचा संसर्ग आपल्याला टाळता येतो. त्यामुळे काळजी घेत आपल्याला इथून पुढे वाटचाल करायची आहे, अशं पवार म्हणाले.

शिवाय पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम हा आता सर्व गोष्टींवर होताना दिसून येतोय. कोरोनाच्या परिस्थितीत लॉकडाऊन असल्यामुळे लोकं बोलत नाहीत, त्याचाच फायदा घेतला जातोय. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची आता गरज असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-इतिहासात अशी इंधन दरवाढ मी पाहिली नाही- शरद पवार

-काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी ED चा छापा

-देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर अजित पवार म्हणाले…

-पडळकरांच्या त्या जहाल टीकेवर शरद पवार अखेर बोलले, म्हणाले…

-राष्ट्रवादीने आम्हाला ऑफर दिली होती म्हणणाऱ्या फडणवीसांना पवारांनी दिलं उत्तर