“IFSC सेंटर गुजरातला हलवल्यास देशाचं मोठं आर्थिक नुकसान होईल”

मुंबई | मुंबईतील आयएफएससी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला आहे.

आयएफएससी सेंटर मुंबईलाच ठेवा. हे सेंटर गुजरातला हलवल्यास देशाचं मोठं आर्थिक नुकसान होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईची पतही घसरेल, असा इशारा शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

गुजरातमध्ये IFSC स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईतच हे प्राधिकरण स्थानांतरित करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

IFSC प्राधिकरण ही देशातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधील सर्व वित्तीय सेवांचे नियमन करण्यासाठी युनिफाइड एजन्सी आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक भांडवल यादृष्टीनेही IFSC ला स्थानांतरित करण्यासाठी सर्वोत्तम  पर्याय आणि स्थान आहे असंही शरद पवार म्हणाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘रडीचा डाव खेळू नका’; जयंत पाटलांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

-“IFSC च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विरुद्ध गुजरात’ अशी नवी स्क्रिप्ट लिहिली जातीये परंतू जनता मूर्ख नाही

-….तरच तुम्हाला प्रवासाचा पास मिळू शकतो, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

-IFSC गुजरातला हलवण्याच्या मुद्द्यावरून, शरद पवारांच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

-नागरिकांनो घाबरू नका… कोरोना बरा होतोय; उपचारानंतर डॉक्टरांनी निभावला पुन्हा रूग्णसेवेचा धर्म