महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | राज्यातील सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल का?, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आलाय. यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता कमी आहे, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. पण त्यांनी राष्ट्रपती राजवट लागणारच नाही, असं म्हटलं नाही. यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

एकनाथ शिंदे सांगतात त्यांच्याकडे संख्या आहे, तर मग ते गुवाहाटीमध्ये का थांबले आहेत? जर अडीच वर्षे सोबत होते तर आता का तक्रारी करत आहेत?, असे प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केले.

एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आजच्या आघाडीला आमचा पाठिंबा आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

मला जी शिवसेना माहिती आहे ती हे सहन करणार नाही. शिवसैनिकांची आपल्या संघटनेसाठी कष्ट करण्याची तयारी आहे. त्यांच्यात प्रचंड शक्ती आणि संघटन आहे. त्यामुळे जरी 40-50 आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तरी संघटनेवर काही परिणाम होणार नाही, असं पवार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिंदे गटाच्या वतीने वकील हरिश साळवे न्यायालयात बाजू मांडणार; एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क 

“नाच्यांना सुरक्षा देऊन भाजपच्या महाराष्ट्रद्रोहाचं पितळ उघडं” 

संजय राऊतांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊतही शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत! 

“महाराष्ट्रातील मविआ सरकार आणखी दोन-तीन दिवस चालणार” 

संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ