महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकणारच!; शरद पवारांना विश्वास

जळगाव | महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी भाजपचे नेते कितीही करत असले तरी महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

आम्ही खेड्यापाड्यात राहणारे लोक आहोत. आम्हाला ज्योतिष कळत नाही. ज्योतिष कळणारे लोक भाजपमध्ये जास्त आहेत. पण त्यांचं भविष्य खरं ठरत नाही आणि अजून चार वर्षे तर खरं होणार नाही, असा खोचक टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे.

भाजप मिशन लोटस नावाने मोहिम उघडणार असल्याचं बोललं जात आहे. त्याने काही एक फरक पडणार नाही. मध्यवधी निवडणुकींचीही चर्चा आहे पण ही चर्चा कोणी आणली हे मला माहिती नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही बाब दुर्दैवी आहे. सरकार कोणाचंही असो महिलांवर अत्याचार होणं सरकारला शोभणारं नाही, अशा शब्दांत पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या- 

-तू राजकारणात आलीस. तुझा भाऊ का नाही?; पूनम महाजन म्हणतात…

-“शेतकऱ्यांनो आता वीज बीलं भरुच नका”

-“कर्जमुक्ती हा तर केवळ प्रथमोपचार; शेतकऱ्यांचं जीवनमान बदलाव यासाठी सरकार प्रयत्नशील!”

-किर्तनकारांबद्दल माझ्या मनात नेहमी सन्मानच पण,…- सुप्रिया सुळे

-तरूणाईला ठाकरे सरकारचा दिलासा; 8 हजार पोलिस तर 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या होणार भरत्या!